विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, २९ नोव्हेंबरला मतदान

 विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,  २९ नोव्हेंबरला मतदान


 

मुंबई : काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केला. गुप्त मतदान पद्धतीने पोटनिवडणूक होणार असल्याने बिनविरोध न होता प्रत्यक्ष मतदान झाल्यास सत्ताधारी महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, २२ तारखेपर्यंत माघार घेता येईल.  खुल्या पद्धतीने मतदान असल्याने राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. विधान परिषदेकरिता गुप्त मतदान पद्धतीची कायद्यात तरतूद आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफू ट होण्याची नेतेमंडळींना बहुधा भीती असावी. यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे पावसाळी अधिवेशनात टाळण्यात आले होते. यावर मार्ग म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रि येत बदल करून गुप्तऐवजी आवाजी मतदानाने निवड करण्याची नियमात सुधारणा करण्यात येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा बदल करून मगच अध्यक्षांची निवडणूक घेण्याची योजना आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post