काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली गझल मैफिल video

 काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली गझल मैफिल ;

 डॉ.दोस्त मोहम्मद, आरती पाटणकर यांच्यासह किरण काळेंच्या गझल गायनाला नगरकरांची भरभरून दाद



नगर : शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने शहरामध्ये पहिल्या किरण अहमदनगर फेस्टिवल २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल अंतर्गत तंजिम-ए-उर्द-अदबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाम-ए-गझल या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर शहरामध्ये गझल मैफल रंगली होती. 



सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहामध्ये पार पडलेल्या या गझल मैफिलीच्यावेळी औरंगाबादचे सुप्रसिद्ध गझल गायक डॉ. दोस्त मोहम्मद, गायिका आरती पाटणकर यांनी सादर केलेल्या गझलला नगरकरांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमामध्ये किरण काळे यांना उपस्थितांनी गायनाचा आग्रह धरला. काळे यांनी देखील त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद देत स्वतः हर्मोनियम हातात घेत सुप्रसिद्ध मराठी गझलकार सुरेश भट यांनी लिहिलेल्या व पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी गायलेल्या 'पहाटे पहाटे मला जाग आली' ही गझल सादर करीत नगरकरांची मने जिंकली. 


काळे तसे राजकारणी व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांनी अचानकपणे एखाद्या व्यावसायिक गायका प्रमाणे उत्तमरित्या सादर केलेल्या गझल गायनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काळे यांनी तीन वर्ष सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्याकडे तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित शौनक जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रोक्त गायनाचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे. उपस्थितांच्या आग्रहाखातर अनेक दिवसांनंतर जाहीर कार्यक्रमातून गाण्याचा आनंद घेतला आल्याची भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली. 


तंजिम-ए-उर्द-अदबचे अध्यक्ष व काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांच्या पुढाकारातून या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. दोस्त मोहम्मद, आरती पाटणकर यांनी अनेक नवोदित गझलकारांच्या रचना सादर केल्या. या रचनांना संगीतबद्ध करण्याचे काम डॉ.मोहम्मद यांनी केलेले आहे. यावेळी उपस्थितांच्या फर्माईशी वरून डॉ  मोहम्मद गझल गायक मेहदी हसन यांची लोकप्रिय असणारी 'रंजिश ही सही' ही गझल उपस्थित रसिकांची विशेष दाद मिळवून गेली. 


हार्मोनियम वर गजानन केचे, तबल्यावर संतोष केचे, शेर मोहम्मद खान, डॉ. मोहम्मद खान यांनी साथ केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खलील सय्यद यांनी केले. यावेळी अशोकराव गुंजाळ, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, प्रा. डॉ. बापूसाहेब चंदनशिवे, नूर सय्यद, निवृत्त प्राचार्य कादिर सर, इंजिनीयर मोहम्मद इक्बाल, निसार बागवान, आर्किटेक्ट सय्यद मोईन, नगरसेवक असिफ सुलतान, डॉ.रिजवान शेख, आरटीओ इन्स्पेक्टर शेळके, के.के.खान, खलील चौधरी, युनुसभाई तांबटकर, कवयत्री कमर सुरूर, कवयत्री नफिसा आया, कवी सलीम यावर, कवी आबिद खान, जलील अमरवली, शाह चष्मावाला, आय. बी. शहा, शफी कविजंग जहागीरदार, इंजि.मोहम्मद अकील, मुनवर हुसेन, ॲड. एस. बी. शेख यांच्यासह अनेक मान्यवर व शहरातील गझल रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post