नगर अर्बन बँक निवडणूक, सहकार पॅनलकडून भाजपचे शहर जिल्हाध्यक्षही रिंगणात, सुवेंद्र गांधी म्हणाले....व्हिडिओ

नगर अर्बन बँक निवडणूक, सहकार पॅनलकडून भाजपचे शहर जिल्हाध्यक्षही रिंगणात, सुवेंद्र गांधी म्हणाले....व्हिडिओ
 नगर (सचिन कलमदाणे) :- नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनलच्या सर्व अठरा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात आरती करून सहकार पॅनलने अर्ज भरण्यापूर्वी मोठे शक्तीप्रदर्शन केलं. स्व.दिलीप गांधी यांच्या स्नुषा दीप्ती सुवेंद्र गांधी यांच्यासह शैलेश मुनोत, अशोक कटारिया, मनिषा कोठारी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, सचिन देसरडा, ईश्वर बोरा, अनिल कोठारी, राजेंद्र अग्रवाल, राहुल जामगावकर,  गिरीश लाहोटी, संपत बोरा, अजय बोरा, संगीता दिपक गांधी, कमलेश गांधी, अतुल कासट, मनेष साठे,  नंदा मनेष साठे, गुजराथ शाखेतून दिनेश कटारिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्व.दिलीप गांधी यांचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प करून सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी सांगितलं.  


व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post