जिल्हा रुग्णालयात अग्निकांड.... चौकशीबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा

 जिल्हा रुग्णालयात अग्निकांड.... चौकशीबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणानगर: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री थोरात, कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

थोरात म्हणाले, "या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. विभागीय आयुक्तांमार्फत ही चौकशी होईल. या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे." मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण मार्फत दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणाही थोरात यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post