शिक्षक बँकेच्या संचालकांनी लॉकडाऊनच्या काळात केला कोट्यवधीचा भ्रष्टाचार

 शिक्षक बँकेच्या संचालकांनी केला लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधीचा भ्रष्टाचार


लॉकडाऊनच्या काळात घेतला ३० लाख प्रवास भत्ता 


इब्टा प्रणित बहुजन शिक्षक मंडळाचे घंटानाद व धरणे आंदोलन


पंधरा दिवसात बहुजन मंडळाच्या विविध मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व शाखा बंद करणार - एकनाथ व्यवहारे



 नगर -अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बँक कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या,जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही संचालकांनी ३० लाख रुपयांचा प्रवासभत्ता घेतला असल्याचा आरोप करत कोविडच्या काळात कर्जवितरण घोटाळा झाला आहे.सभासदांचा आरबीआयच्या नावाखाली 2019- 20 चा लाभांश लपवला आहे,शिक्षक बँकेने बेहिशोबी घड्याळ खरेदी करून मोठा घोटाळा केला आहे.सभासदांच्या खिशातून पैसे काढून मनमानी पद्धतीने संचालक मंडळाचा कारभार सुरू आहे.बँकेच्या निधीचा विणीयोग करण्यात अकार्यक्षमता संचालक मंडळाची दिसून येत आहे. बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ स्वतःचे खिसे भरण्यात मग्न असून सभासदांना फसवण्याचा सपाटा संचालक मंडळाकडून चालू आहे. या मंडळाचा भ्रष्ट कारभार सभासदां समोर बहुजन मंडळ मांडणार आहे. व प्राथमिक शिक्षक कर्मचारी अनियमित पदोन्नत्या तसेच भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी इब्टा प्रणित बहुजन मंडळाच्या वतीने आज शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सदर आंदोलनात बहुजन शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे,राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे,इब्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, राजेंद्र कडलग,सुहास पवार,अरुण मोकळ,रामभाऊ गवळी, रवी रुपवते, सतीश मुनतोंडे, विजय काटकर, भगवान लेंडे, अशोक नेवसे, नवनाथ अडसूळ, सुभाष भिंगारदिवे, अविनाश बोधक, सतीश जाधव, विलास गव्हाणे, अशोक देशमुख,सुभाष बगनर, मिलिंद खंडीझोड तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post