नगर-मनमाड महामार्गावरील ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडले

 नगर-मनमाड महामार्गावरील ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडून चोरीनगर- नगर-मनमाड महामार्गावर विळद गावच्या शिवारात जगताप नर्सरी शेजारी असलेल्या बालाजी रोडलाईन्स ऍण्ड लॉजिस्टीक या ट्रान्सपोर्टचे ऑफीस फोडून चोरट्याने रोख रक्कम व मोबाईल असा 47 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत बाबासाहेब हौशिराम आंधळे (रा.राहुरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने मंगळवारी (दि.2) पहाटे आंधळे यांच्या ट्रान्सपोर्टचे ऑफीसचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत रोख रक्कम मोबाईल चोरुन नेला. या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तातडीने तपास करत पोलिसांच्या पथकाने आरोपी महादेव उर्फ शिवाजी रंगनाथ काळे (रा.दशमीगव्हाण, ता.नगर) यास मंगळवारी (दि.2) रात्री 7.45 च्या सुमारास अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post