तलाठ्याने मित्रांनाही बोलावले महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे,गावकऱ्यांनी दिला चोप

 महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोपअमरावती : जिल्ह्यातल्या पिंपळगाव बैनाई येथे एक वेगळाच प्रकार घडला. बहुतेक वेळा तलाठी कार्यालयात शेतकरी कामानिमित्त येतात. मात्र, तलाठी आणि त्याच्या काही मित्रांनी एक महिलेला तलाठी कार्यालयात बोलावले. त्याच ठिकाणी त्यांनी अश्लील चाळे सुरू केले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्यानं व त्याच्या काही मित्रानी हा प्रताप केलाय. तलाठी कार्यलयात एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक घटना घडली. हा प्रकार गावकऱ्यांनी या तलाठ्याला व महिलेला रंगेहाथ पकडून समोर आणला आहे. त्यामुळं तलाठी कार्यालय नागरिकांच्या कामांसाठी आहे की अश्लील चाळे करण्याचा अड्डा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पिंपळगाव बैणाई येथील तलाठी कार्यालयातील व्ही भगत या तलाठ्यानं बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला आणले. सोबतच त्याच्या पाच मित्रांना बोलावून कार्यालयात दारू पिऊन अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात अश्लील चाळे सुरू असल्याची कुजबूज गावातील नागरिकांना लागली. पाच ते सहा नागरिकांनी तलाठी कार्यालय गाठले. या कार्यालयात सुरू असलेला प्रकार पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यामध्ये गावकऱ्यांनी तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला चांगलाच चोपही दिला. यामध्ये तीन मित्र हे पसार झाले आहेत. दरम्यान, तलाठी कार्यालयात असा प्रकार नेहमीच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणंय. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post