ज्येष्ठ नेते म्हणाले लोकसभा लढवू नका, आ.लंके म्हणतात 'लक्ष्मणरेषा' ओलांडणार नाही....

ज्येष्ठ नेते म्हणाले लोकसभा लढवू नका, आ.लंके म्हणतात 'लक्ष्मणरेषा' ओलांडणार नाही....  पारनेर - आमदार नीलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलासारखे महाराष्ट्रात काम करा. त्यांच्यासारखे व्हा, परंतु आपले अंथरूण, पांघरूण सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे यांनी आ. लंके यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याचे सांगितले.  

टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा प्रारंभ आ. लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला.  

ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात आ. लंके यांचे चांगले काम आहे. त्यामुळे आ. लंके यांनी वरच्या (लोकसभा) निवडणुकीचा विचार करू नये. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले पाहिजे. आ. लंके यांचे कोरोना काळातील आदर्श काम   जगाने पाहिले आहे्.त्यामुळे त्यांच्या कामांसाठी कुणाच्या साक्षीची गरज नाही. त्यांचे काम देशात पोहचले आहे.

‘माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी मला खासदारकीचा विचार सोडून द्या, असे सांगितले असून ‘झावरे साहेबांची लक्ष्मणरेषा मी ओलांडणार नाही’ अशी ग्वाही आ. नीलेश लंके यांनी दिली. तसेच माजी आ. विजय औटी यांचे नाव न घेता ‘त्यांना संताजी-धनाजी सारखा मी दिसत असेल तर तो माझा दोष नाही’ अशी कोपरखिळी मारली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post