'लालपरी' पुन्हा एकदा रस्त्यावर

 'लालपरी' पुन्हा एकदा रस्त्यावर वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागलेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्यात. कोल्हापुरातून तब्बल १८ दिवसानंतर एसटी धावलीय. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही एसटी इचलकरंजीच्या दिशेने रवाना झाली. तिकडे वसई आगारातूनही लालपरी धावलीय. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केलाय.. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post