आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

 आणखी एका ST कर्मचाऱ्याची आत्महत्या; कमी पगारामुळे उचलले टोकाचे पाऊल!नाशिकः राज्यभर पेटलेला एसटी आंदोलनाचा वणवा आता भडकला असून, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते. दुसरीकडे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले असून, लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post