ऐन दिवाळीत 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

 ऐन दिवाळीत नाशिकमध्ये 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न; बोनससह हाती फक्त साडेचार हजारांचा पगार आल्याने घेतले विषनाशिकः ऐन दिवाळीत नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यात एका कर्मचाऱ्याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी एकीकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार पातळीवर त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, त्यावर अजून ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच इगतपुरी तालुक्यात दोन कर्मचाऱ्यांनी आणि कळवणध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनी कर्मचाऱ्यांमध्ये पराकोटीचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील दहा कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे एकाने रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने गळफास घेण्याचा. कळवणमध्ये प्रमोद शिवाजी सूर्यवंशी (वय 38 रा. वाजगाव, ता. देवळा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांनी सुट्टी घेतली होती. त्यासाठी पगारी रजेचा अर्ज दिला. मात्र, ही सुट्टी मंजूर झाली नाही. परिणामी हातात फक्त दोन हजारांचा पगार आणि बोनस मिळून फक्त साडेचार हजार रुपये आहे. या पैशात दिवाळी कशी साजरी करायची, घर कसे भागायचे यातून त्यांनी विषारी औषध घेतले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांचावर उपचार सुरू आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post