पोलिसांची कर्तव्यदक्षता...खा.ओवेसींच्या VIP वाहनावर केली दंडात्मक कारवाई...वरिष्ठांनी दिले बक्षीस

पोलिसांची कर्तव्यदक्षता...खा.ओवेसींच्या VIP वाहनावर केली दंडात्मक कारवाई...वरिष्ठांनी दिले बक्षीस सोलापूर - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  मंगळवारी सोलापूरमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात आले होते.   यादरम्यान त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. ओवेसी आलेल्या लॅन्डरोव्हर,   वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे, सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम 50/177 अन्वये कारवाई करण्यात आली. 

खासदार असदुद्दीन औवेसी यांचा सोलापूरातील कार्यक्रमासाठी येतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते नंबर प्लेट नसलेल्या वाहनात दिसत आहेत. मात्र, यावेळी मास्क घालायला ते विसरले नाहीत, गाडीतून उतरण्यापूर्वी मास्क घातलेले दिसत आहेत. पण, त्यांच्या ज्या गाडीतून प्रवास केला त्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित गाडी चालकावर कारवाई करत 200 रुपयांचा दंड ठोठावला. पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे ही कामगिरी केली. त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी चिंताकिंदी यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला. ‘लोकमत’ने सदर वृत्त दिले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post