नगर जिल्ह्यातील एस.टी.रस्त्यावर...कामगार कर्तव्यावर हजर

नगर जिल्ह्यातील एस.टी.रस्त्यावर...शेवगाव आगारातील कामगार कर्तव्यावर हजर

 


नगर- जिल्ह्यातील शेवगाव बस आगारातील कर्मचारी आणि एसटी आगार प्रमुख यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद आंदोलन मागे घेतले असून शेवगाव आगारातून बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत.  सर्वात पहिली बस शेवगाव आगारातून अहमदनगरच्या दिशेने रवाना झाली आहे. आमच्या ज्या मागण्या रास्त आहेत. मात्र कुठेतरी प्रवाशांची होणारी अडचण, विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि खाजगी प्रवासी वाहतूकदारांकडून  होणारी प्रवाशांची लूट थांबवावी म्हणून आम्ही दोन पावले मागे घेत एसटी आगारातून बस सुरू करत आहोत.


मात्र शासनामध्ये विलीनीकरणाचा लढा याही पुढे सुरूच राहील. त्याचबरोबर 41 टक्के पगारवाढ ही सरसकट देणे गरजेचे आहे. नवीन कर्मचाऱ्यांना जास्त आणि जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार वाढ हा दुजाभाव राज्य सरकारने करून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे पाप केले आहे. त्यामुळे 41% पगार वाढ ही सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दिली जावी अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post