माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची मोर्चेबांधणी...सत्काराच्या निमित्ताने शिवसेना नगरसेवकांशी थेट हितगुज

 महापौर पदाच्या माध्यमातून शहर विकासाला चालना दयावी - मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने शिवसेनेचे मा.विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांना दिल्या शुभेच्छाअहमदनगर - पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन शहर विकासाला गती दयावी. नगर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे विकास कामाच्या माध्यमातून नगर शहर राज्याच्या नकाशावर येण्यासाठी प्रयत्न करावे,महापालिकेला केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ तसेच विकास कामासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा जेणेकरून मोठा निधी शहर विकासासाठी मिळेल.नगर शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.             

         शिवसेनेचे मा.विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मनपा सभागृहनेते अशोक बडे,नगरसेवक अनिल शिंदे,नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक आप्पा नळकांडे,मा.नगरसेवक दत्ता पाटील सप्रे,अनिल लोखंडे,कैलास शिंदे,अमोल सुरवसे तसेच शिवसेनेचे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post