राज्यात पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस

 महाराष्ट्रात पुढचे 2,3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post