प्रतिक काळे याच्या बहिणीचा मोठा खुलासा....मंत्री गडाखांबाबत महत्त्वाचे वक्तव्य...

प्रतिक काळे याच्या बहिणीचा मोठा खुलासा....मंत्री गडाखांबाबत महत्त्वाचे वक्तव्य...

 


नगर - जिल्ह्यातील  मंत्री गडाख यांच्याशी संबंधित मुळा एज्युकेशन संस्थेतील प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या आत्महत्येनंतर मंत्री गडाख यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले. परंतु  नामदार शंकरराव गडाख यांनी काही खुलासा केल्यानंतर आता  प्रतिक काळे या तरुणाच्या बहिणीनेही खुलासा केला आहे. तिने केलेल्या खुलाश्यामध्ये म्हटले आहे की, प्रतिकच्या आत्महत्या प्रकरणात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नाही.  प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं सांगितले होते. या सर्व प्रकरणात गडाख दोषी असते तर आम्ही सोडलं नसतं, असेही प्रतिकच्या बहिणीने म्हटलं आहे.

 प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात प्रतिक काळे हा युवक कार्यरत होता. चार दिवसांपू्र्वी प्रतिकने सुसाईड केली. सदर कृत्य करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ व्हायरल केला होता. प्रतिक काळे हा काही वर्ष प्रशांत गडाख यांचे सहाय्यक म्हणून काम पाहिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणानंतर भाजपने मंत्री गडाख यांच्यावर अनेक आरोप केले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post