पोपटराव पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

 पोपटराव पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान





नगर तालुक्यातील हिवरे बाजार या छोट्याशा खेडेगावाचे नाव जागतिक पातळीवर पोहचविणारे, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना आज सोमवारी (दि.८)देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. यंदा सात मान्यवरांचा 'पद्म विभूषण', १० मान्यवरांचा 'पद्मभूषण' आणि १०२ जणांचा 'पद्मश्री' पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर १६ जणांना मरणोत्तर 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'पद्म विभूषण' प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचं पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे. पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्त) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना 'पद्वभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post