जिल्हा रूग्णालय अग्नीकांड....डॉ.सुनिल पोखरणा यांच्या अडचणी वाढणार...सेनेच्या गिरीश जाधव यांनी केली महत्त्वाची मागणी

 

जिल्हा रूग्णालय अग्नीकांड....डॉ.सुनिल पोखरणा यांच्या अडचणी वाढणार...सेनेच्या गिरीश जाधव यांनी केली महत्त्वाची मागणीनगर - जिल्हा रुग्णालयाच्या जळीत प्रकरणात  जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या संदर्भात दाखल असलेल्या अटकपूर्व जामीन अर्जला हरकत घेतल्या प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक 25 रोजी ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या आगीत आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन गुन्हा दाखल झालेला आहे. चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन सुद्धा मिळाले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना सुद्धा न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी डॉक्टर पोखरणा यांच्या जामीन अर्ज संदर्भामध्ये थर्ड पार्टी अर्ज न्यायालयात दाखल करून त्यास हरकत घेतली आहे.  

  गिरीश जाधव यांचे वकील अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयामध्ये आम्ही थर्ड पार्टी अर्ज दाखल केलेला आहे, घटना घडण्याच्या तीन आठवडे अगोदर आम्ही डॉक्टर पोखरणा यांच्या संदर्भामध्ये फिर्याद दिलेली आहे. आम्ही सर्व वस्तुस्थिती मांडलेली आहे व यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर त्याच  निर्णय घेतला असता, तर जिल्हा रुग्णालयात  घटना घडलेली नसती. थर्ड पार्टि अर्ज करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला.  न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या अर्जावर पुढील सुनावणी दिनांक 25 रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  

  गिरीश जाधव यांनी डॉक्टर पोखरणा यांच्या बँक खात्याची तसेच अन्य कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी लेखी स्वरूपामध्ये मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सुद्धा केली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post