तयार रहा...पेट्रोल-डिझेल आता वर्षअखेरीस 'डबल सेंच्युरी' करणार...

  पेट्रोल-डिझेल आता वर्षअखेरीस डबल सेंच्युरी करणार...मुंबई: इंधन दरवाढीच्या माध्यमातून केंद्र सरकार लाखो कोटी कमवत आहे. दिवाळीच्या तोंडावर देखील पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी केंद्र सरकार कडू करणार असल्याची चिन्हे आहेत. १५ ऑक्टोपासून रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३५ पैसे ते ३८ पैशांची वाढ झालेली आहे. एकत्र दरवाढ करण्यापेक्षा रोज थोडी थोडी दरवाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले दिसते. याद्वारे पेट्रोल-डिझेल आता वर्षअखेरीस डबल सेंच्युरी करणार की काय? असा धसका सामान्य नागरिकांनी घेतला आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून लोकांना मोफत कोरोना लस दिली जात असल्याचे खळबळजनक वक्तव्य मध्यंतरी केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले होते. केंद्र सरकारने यावर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. याचाच अर्थ इंधनावरील करातून केंद्र सरकार लाखो कोटींचा मलिदा जमवत आहे. अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोशल मिडियातून केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post