कचोरीसोबत कांदा मिळाला नाही....तरूणीने शिकवला असा धडा...व्हिडिओ

कचोरीसोबत कांदा मिळाला नाही....तरूणीने शिकवला असा धडा...व्हिडिओ नवी दिल्ली - सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कचोरीसोबत कांदा मिळाला नाही म्हणून एक तरुणीने धिंगाणा घातल्याची घटना आता समोर आली आहे. तिच्या या तुफान राड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. तरुणी गार्डनमध्ये सायकलवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या एका विक्रेत्याकडे कचोरी खाते. मात्र कचोरी खाताना सोबत कांदा न दिल्याने ते प्रचंड चिडते, विक्रेत्याशी भांडते आणि त्याच्या सायकलला लाथ मारून ती खाली पाडते. 

 व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे कचोरीची मागणी करते. तेव्हा तिला तो कचोरी देतो पण सोबत कांदा देत नाही. प्लेटमध्ये कांदा नाही म्हटल्यावर तरुणी विक्रीदाराला कांदा देण्यात सांगते मात्र तो कांदा संपला आहे असे सांगतो. ते ऐकताच तरुणी खूपच चिडते. रागाच्या भरात त्याला प्रश्न विचारत त्याच्याशी वाद घालू लागते. 

.व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post