चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केलाय हे सुध्दा मान्य करा...भाजप नेत्याची थेट मोदींवर बोचरी टिका

चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केलाय हे सुध्दा मान्य करा...भाजप नेत्याची थेट मोदींवर बोचरी टिका नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी आज वादग्रस्त तीन नवीन कृषी मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवरच्या भूमिकेवर टीका होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तर केंद्रातील सत्ताधारी भाजपला आपल्याच पक्षाचे नेते सुब्रमण्यन स्वामी घरचा अहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करत चीनवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला, हे आतातरी मोदी कबुल करतील का? असा सवाल सुब्रमण्यन स्वामींनी   उपस्थित केला आहे.

  सुब्रमण्यन स्वामी यांनी यासंदर्भात काही वेळापूर्वीच ट्विट केलं आहे. चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केला आहे, हे आतातरी मोदी मान्य करतील का आणि मोदी आणि केंद्र सरकार देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवतील का? असा प्रश्न सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वामींच्या या ट्विटमुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post