नगर ते कडा रेल्वे ट्रॅकची60 कि.मी. चाचणी यशस्वी

 ❝अहमदनगर ते कडा रेल्वे ट्रॅकची चाचणी यशस्वी!❞

 


 

अहमदनगर ते कडा या 60 किमी अंतरावर   रेल्वे ट्रॅकची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे .दुपारी अडीच वाजता ही चाचणी झाली. नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाची अनेक दशकांपासून जनतेला प्रतीक्षा आहे. सध्या या कामाने गती पकडली असून काही महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील ट्रॅकवर चाचणी झाली होती. आता थेट कड्यापर्यंत चाचणी झाल्याने या बहुप्रतीक्षीत रेल्वेने मराठवाड्यात प्रवेश केला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर या चाचणीबद्दल आनंद व्यक्त करीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे स्वप्न लवकरच साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती. मात्र, नगर बीड परळी या 261 किलोमीटरच्या  रेल्वे मार्गाचा सुरूवातीला 1995 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी केवळ 353 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, बीड-नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टोलवाटोलवीच केली गेली.अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वे मार्गासाठी आता 2800 कोटीची आवश्यकता आहे. पण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव  या 27 वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे हे काम प्रगतीपथावर आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post