400 बळी जाऊनही रस्त्याचे काम होईना...नगर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘चरण’ पूजन आंदोलन...व्हिडिओ

400 बळी जाऊनही रस्त्याचे काम होईना...नगर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे ‘चरण’ पूजन आंदोलन...व्हिडिओ पाथर्डी :- कल्याण -   विशाखपट्टणम या रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण व्हावें यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे चरण पूजनाचा कार्यक्रम करुन अभिनव आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकामध्ये हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, शेवगावचे गणेश रांधवणे,मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड दिनकर पालवे , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, योगेश रासने, नगरसेवक,बंडू पा. बोरुडे, वंचित बहुजन आघाडी च तालुकाध्यक्ष  रवींद्र ऊर्फ भोरू म्हस्के, आर, के चव्हाण, संदीप  काकडे,राजू गिरी ,सोमनाथ फासे , लक्ष्मण डांगे ,अशोक आंधळे,एकनाथ सानप आदी उपस्थित होते.


मेहेकरी ते फुंदे टाकळी पर्यंतच्या ५५ किलो मीटरचे महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेले आहे. ते पुर्ण करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र यामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही. सध्या नेमून दिलेल्या ठेकेदाराने ठिक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. रस्त्याच्या कोणत्याच जागेवरती पूर्णपणे काम झालेले नाही. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे सुमारे 400 लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. खासदार, आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या कामा बाबतच्या अनेकदा पाठपुरावा केला. ते सुद्धा या रखडलेल्या कामाबाबत हतबल झाले आहेत. आज अखेर मनसेच्या आयोजित केलेल्या अभिनव आंदोलनासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत यात सहभाग नोंदवला. रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाले नाही. तर नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पुढील उपोषण करुन आंदोलन करणार आहे. 

व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post