जमावबंदी आदेशावरुन विखेंची राज्य सरकारवर टिका

जमावबंदी आदेशावरुन विखेंची राज्य सरकारवर टिकानगर : ‘सध्या राज्यातील जनतेचे विविध प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. लोक रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे प्रश्न सोडविता येत नाहीत. त्यामुळे लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करून दबाव आणला जात आहे,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ करोना आणि नैसर्गिक आपत्‍तीमुळे राज्‍यातील जनतेचे प्रश्‍न गंभीर बनले आहेत. तीन पक्षांच्‍या सरकारला जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यात कोणतेही स्‍वारस्‍य राहिलेले नाही. जनतेचा उद्रेक रस्‍त्‍यावर येवू नये म्‍हणून सरकार फक्‍त जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्‍न सोडविण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू केले जात आहेत. एसटी कामगार संघर्ष करीत आहेत. आता विजेच्या प्रश्नासाठी गावोगावी रस्त्यावर उतरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post