सामाजिक न्याय मंत्र्यांचं भान हरवलं...दिवाळी कार्यक्रमात हरियाणवी डान्सरचे ठुमके

 सामाजिक न्याय  मंत्र्यांचं भान हरवलं...दिवाळी कार्यक्रमात हरियाणवी डान्सरचे ठुमके, विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणाबीड-  सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे  यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात दिवाळीत स्नेहमीलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सपना चौधरी  हिने ठुमके लगावले. या डान्सचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होत आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. “परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये सरकारी रुग्णालयात अकरा जणांचा दुर्दैवाने आक्रोश करत होरपळून मृत्यू झाला. या घटनेचं सावट असताना, शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाहीत. त्यांची उपाशीपोटी काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना पाहतात” असं विनायक मेटे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post