नगर शहरात कॉंग्रेसचे लक्ष्य विधानसभा...‘भावी आमदार’ नावाचे फलक चर्चेत

 


नगर शहरात कॉंग्रेसचे लक्ष्य विधानसभा...‘भावी आमदार’ नावाचे फलक चर्चेतनगर : राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असले तरी नगर शहरात कॉंग्रेस व राष्ट्रवादीत टोकाचे राजकीय वाद दिसून येतात. विधानसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे असूनही कॉंग्रेसने नगर शहरात विधानसभेची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर काळेंचा उल्लेख ‘भावी आमदार’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नगरमध्ये विधानसभेला शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सरळ सामना दर पंचवार्षिकला रंगत असतो. यात मागील दोन निवडणुकांत राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकदही मोठी आहे. असे असताना आता काळेंच्या माध्यमातून कॉंग्रेसने थेट विधानसभेचीच तयारी चालवल्याने नगरमध्ये तरी आघाडीत आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post