शिवसेनेला मोठा धक्का....बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी

शिवसेनेला मोठा धक्का....बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी  जालना- माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ED कडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली.   

 

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी  ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post