मी आत गेलो...पण तोपर्यंत फार उशीर झाला...सिव्हीलमधील आगीत वडील गमावलेल्या मुलाची व्यथा...

 मी आत गेलो...पण तोपर्यंत फार उशीर झाला...सिव्हीलमधील आगीत वडील गमावलेल्या मुलाची व्यथा...नगर: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली.  विवेक खाटिक यांच्या वडिलांचा आगीत होरपळल्यानं मृत्यू झाला. ते गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत होते. विवेक यांचे वडील कडूबाळ गंगाधर खाटिक (वय ६५ वर्षे) यांचा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डला लागलेल्या आगीत मृत्यू झाला. 'आग लागली त्यावेळी आई वडिलांजवळ होती. मी बाहेर आलो होतो. आग लागल्याचं समजताच मी रुग्णालयात धाव घेतली. मात्र वडिलांना वाचवू शकलो नाही,' असं विवेक यांनी सांगितलं.आयसीयूला आग लागताच आधी आईला बाहेर काढण्यात आलं. मी त्यावेळी बाहेर होतो. मी पळत पळत रुग्णालयात आलो. आगीची तीव्रता जास्त असल्यानं आई मला आता जाऊ देत नव्हती. पण तरीही मी आत गेलो. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, अशा शब्दांत विवेक यांनी घडलेला प्रसंग सांगितला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post