प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण मंत्री गडाख म्हणाले ...

प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण मंत्री गडाख म्हणाले ... दोषी आढळून आलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार



प्रतिक  काळे आत्महत्या प्रकरणावरून  महाविकास आघाडी सरकार  आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'प्रतिक काळेची आत्महत्या दुर्देवी आहे. तो काही माझा स्वीय सहाय्यक नव्हता पण विरोधक केवळ राजकीय हेतूने आरोप करत आहे, त्यांनी एक तरी पुरावा द्यावा' असं म्हणत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांनी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांना फटकारून काढले.

प्रतिक काळे आत्महत्या प्रकरणावर  शंकराव गडाख यांनी नी आपली भूमिका मांडत भाजप नेत्यांचा खडेबोल सुनावले आहे.'माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. केशव उपाध्याय यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने आहेत. सदर प्रकरणाची कोणत्याही समितीने सखोल चौकशी करावी आणि जर दोषी आढळून आलो तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचंही  शंकरराव गडाख यांनी म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post