विधानपरिषद निवडणुक... चर्चा तर होणारच माजी मंत्री कर्डीले यांनी खासदार विखे पाटीलांचे केले तोंड गोड

विधानपरिषद निवडणुक... चर्चा तर होणारच माजी मंत्री कर्डीले यांनी खासदार विखे पाटील यांचे केले तोंड गोडनगर : अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणूक जवळ आली आहे. विद्यमान आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपत आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून सध्या माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित समजले जात आहे. त्या अनुशंगाने शिवाजी कर्डिले यांनी आज जिल्ह्यातील नेते मंडळींना बुऱ्हाणनगर येथे फराळाला बोलावले होते. हा राजकीय फराळ आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 

विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाला मागविली होती. ही माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविली आहे. त्यामुळे आता कर्डिले निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.शिवाजी कर्डिले दर वर्षी दिवाळी फराळाचा कार्यक्रम घेतात. मात्र यंदाच्या फराळ कार्यक्रमाला विधानपरिषद निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी आहे. कर्डिलेनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना दिवाळी निमित्त मिठाई पाठविली. तसेच फराळाच्या कार्यक्रमालाही आमंत्रण दिले होते. त्यानुसार आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. सुजय विखे पाटील बुऱ्हाणनगरला आले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post