दुर्दैवी घटना...भाऊबीजेच्या आदल्या दिवशी बहीण-भावाचा अपघातात मृत्यू

 भाऊबीजेच्या आदल्या दिवशी बहीण-भावाचा अपघातात मृत्यू, वसमतमधील दुर्दैवी घटना



हिंगोली :   दिवाळीच्या काळात मामाच्या गावी जाणाऱ्या भावा बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे.  विरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरविंद सूर्य यांची दोन मुले कीर्ती सूर्य आणि आदर्श सूर्य मामा राजू खिलारे यांच्यासोबत गावी जात होती. 

मामाच्या गावी जात असताना वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ अचानक समोरून टाटा मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 1620 ला जोरदार धडक दिली आणि या धडकेत आदर्श सूर्य (9)आणि कीर्ती सूर्य (8) या दोघांचा या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. तर मामा राजू खिलारे (24) यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना 4 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाटा मॅजिक पिकप चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर मामा राजू खिलारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post