गुजरात हादरले! द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के

गुजरात हादरले! द्वारकामध्ये भूकंपाचे धक्केगुजरातमधील द्वारकामध्ये गुरुवारी 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 3:15 वाजता झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आज सकाळी आसामध्ये तेजपूरला पण 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ने दिली.ऑगस्ट महिन्यात गुजरातच्या जामनगरमध्ये 4.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.

स्थानिक लोक स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उंच रस्त्यावर धावताना दिसले. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे गंभीर नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post