उत्तम साहित्याची जाण असलेला "ग्रामसेवा संदेश" दिवाळी अंक - ना. बाळासाहेब थोरात

 उत्तम साहित्याची जाण असलेला  "ग्रामसेवा संदेश" दिवाळी अंक :-  ना. बाळासाहेब थोरात.                 बलीप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर आज सकाळी संगमनेर येथे  महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी "ग्रामसेवा संदेश"  या दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न झाले. 

                   या प्रकाशनप्रसंगी ना.थोरात म्हणाले गेल्या 15 वर्षांपासून मी या दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असून दरवर्षीच्या अंकात उत्तम साहित्य, वैविध्यपूर्ण जाहिराती, आकर्षक मुखपृष्ठ असा हा दिवाळी अंक असतो. ग्रामसेवक वर्गाला लिहीत करून त्यांच्यातून साहित्यिक घडविण्याचे काम तसेच इतर साहित्यिक यांनाही सामावून घेऊन त्यांना ही लिहिण्यासाठी व्यासपीठ  ग्रामसेवा संदेश या दिवाळी अंकाद्वारे केले जात आहे. ग्रामसेवकांचे राज्याचे नेतृत्व करून व्यस्त जीवनातही  साहित्याची जाण असलेले संपादक एकनाथराव ढाकणे व सहसंपादक राजेंद्र फंड हे सदोदित अंक कसा वाचनीय होईल याकडे लक्ष देत असतात. मागील वर्षीच्या त्यांच्या अंकाला शब्दगंध साहित्य परिषदेचा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मी मनापासून या अंकाचे  संपादक, सहसंपादक व संपादकीय मंडळाचे कॊतुक करतो. 

                      प्रास्तविकात संपादक एकनाथराव ढाकणे म्हणाले ग्रामसेवक पतसंस्था, ग्रामसेवक संघटना, व विविध फर्म च्या जाहिरातीवर हा अंक निघत असून कुठलेही शुल्क न घेता गेल्या 15 वर्षांपासून "अहर्निश ग्रामसेवेचे व्रत घेऊन" नवोदित व दर्जेदार साहित्यिकांचे  साहित्याबरोबरच विचारवंतांचे लेख, वेगवेगळे शासननिर्णय   या दिवाळी अंकात समाविष्ट केले जातात. साहित्यिक व साहित्यप्रेमी "ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक" कधी प्रकाशित होतो व कधी वाचावयास मिळतो याची वाट पहात असतात.त्याचबरोबर  ग्रामसेवकांच्या टेन्शनमय जीवनातून त्यांना लिहीत करून  साहित्यिक घडविण्याचे काम हा आमचा "ग्रामसेवा संदेश'दिवाळी अंक  करत आहे

                           कार्यक्रमास जि. प.सदस्य रामहरी कातोरे, कैलास वाकचौरे, साहित्यिक लोकसेवक प्राध्या.बाबा खरात हे प्रमुख पाहुणे हजर होते. पाहुण्यांचे स्वागत सहसंपादक श्री. राजेंद्र फंड व आभार ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावशे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे व रमेश बांगर,ग्रामसेवक संघटनेचे  राज्य कॊन्सिलर श्री.सुरेश मंडलिक,ग्रामसेवक संघटनेचे संगमनेर कार्यकारिणी सदस्य अशोक बलसाने, बाळासाहेब क्षीरसागर यांनी कष्ट घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post