ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे त्यांच्या ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकास राज्यस्तरीय उत्कृष्ट पारितोषिक जाहीर

ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे त्यांच्या दिवाळी अंकास राज्यस्तरीय उत्कृष्ट पारितोषिक जाहीरअहमदनगर : “शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक २०२० स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये प्रथम शब्द शिवार,द्वितीय अक्षर वैदर्भी,तृतीय क्रमांक पदमरत्न दिवाळी अंकास पारितोषिक जाहिर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

      प्रा.मारुती सावंत,अजयकुमार पवार व भारत गाडेकर यांनी परीक्षण करून सविस्तर माहिती दिली ती अशी 

प्रथम पारितोषिक शब्द शिवार : संपादक इंद्रजित घुले,मंगळवेढा,

द्वितीय पारितोषिक  अक्षरवैदर्भी : संपादक डॉ.सुभाष सावरकर,अमरावती,

 तृतीय पारितोषिक  पदमरत्न : संपादक  रवींद्र पाटील,इचलकरंजी,

 उत्तेजनार्थ पारितोषिक साहित्य साधना : संपादक संजय पठाडे,पारनेर,

 संगम : संपादक किसन भाऊ हासे, संगमनेर व ग्रामसेवा संदेश : संपादक एकनाथराव ढाकणे,शेवंगाव  

सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह व पुस्तकं असे पारितोषिकाचे स्वरूप राहणार आहे.

       शब्दगंध च्या वतीने नेहमीच नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबविले जातात,संपादकांनी दोन महिने परिश्रम करून दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून दिलेला असतो,त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे स्पर्धा प्रमुख किशोर डोंगरे यांनी सांगितले.सन २०२० मध्ये कोरोना च्या कालावधीत एकत्र न येता काही साहित्यिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले.उत्कृष्ट ठरणाऱ्या दिवाळी अंकाच्या संपादकांचा पारितोषिक देऊन लवकरच गौरव करण्यात येणार आहे.पारितोषिक प्राप्त दिवाळी अंकाच्या संपादकांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी,ज्ञानदेव पांडूळे,भगवान राऊत,भाऊसाहेब सावंत,सुभाष सोनवणे,डॉ.राधाकृष्ण जोशी,राजेंद्र पवार,डॉ.अशोक कानडे,विनायक पवळे,राजेंद्र फंड,बबनराव गिरी,किशोर डोंगरे,प्रा.तुकाराम गोंदकर व शर्मिला गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post