कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट देण्याचे आमिष फसवणुकीचा गुन्हा दाखल

 कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट  देण्याचे आमिष फसवणुकीचा गुन्हा दाखलनाशिकः ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 लाख रुपये हडपल्याप्रकरणी नाशिकमध्ये आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन कंपनीचा संचालक रवींद्र दराडे, मनीषा दराडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात ललितास सोनवणे यांनी तक्रार दिलीय. त्यानुसार दराडे दाम्पत्याने सोनवणे यांना आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन कंपनीत सहा लाखांची गुंतवणूक करायला लावली. त्यातून दहा महिन्यांमध्ये दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. मात्र, दहा महिने झाल्यानंतर दुप्पट परतावा तर सोडाच, पण गुंतवणूक केलेले पैसेही वापस मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. रेहाना रफिक शेख (वय 55, रा. शिवाजीरोड, शालिमार) या आपल्या पतीसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी जवळपास दोन लाखांची रक्कम बँकेतून काढली. पैसे आपल्याजवळच्या पिशवीत ठेवले. दोघेही बँकेतून बाहेर पडताच मोटारसायकलवर आलेले चोरटे रेहाना यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पसार झाले. शेख दाम्पत्याने चोर, चोर अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रेहाना शेख यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post