हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत...आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले

  हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत...आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेलेमुंबई : धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपावर टीका केली होती. आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका मुंडे यांनी केली होती. दरम्यान दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असं फडणवीस म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post