राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा....पक्षात खळबळ

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा....पक्षात खळबळ परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना फोनवरून राजीनामा दिल्याचे समजते. दरम्यान, दुरांनीच्या रजिनाम्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली असून उलटसुलट चर्चाना वेग आला आहे.

आमदार दुरांनी यांना १८ तारखेला एका इसमकडून मारहाण झाली होती आणि त्यानंतर पाथरी शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करत पाथरी बंद करण्यात आला. आमदार दुर्रानी आणि त्यांचे समर्थक आरोपी मोहम्मद बिन सईद त्याला हद्दपार करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. मात्र, एक आठवडा उलटल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही. म्हणूनच बाबाजाणी नाराज असल्याचं सांगितले जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post