करोना रुग्णांना दारू दिल्यास ते बरे होतात असा दावा करणाऱ्या त्या डॉक्टरला केले निलंबित

करोना रुग्णांना दारू दिल्यास ते बरे होतात असा दावा करणाऱ्या त्या डॉक्टरला केले निलंबितराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण भिसे यांनी कोरोना काळात चुकिचे वक्तव्य केल्याने अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी डॉ. भिसे यांना सेवेतुन कार्यमुक्त केले आहे.


उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रंमाक १ नुसार मा.निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण अहमदनगर यांचे पत्रानुसार डॉ.अरुण भिसे बैद्यकिय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वक्तव्याची सखोल चौकशी करणे बाबत पत्र प्राप्त झाले होते. त्या नुसार संदर्भ क्रंमाक २ अन्वये-मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहमदनगर यांची मंजुर टिप्पणी नुसार सदंर्भ क्रंमाक ३ अन्वये डॉ.अरुण भिसे वैद्यकिय अधिकारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण भिसे यांनी कोरोना काळात चुकिचे वक्तव्य केल्याने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधीकारी तसेच जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधीकारी यांचे आदेशावरुन अहमदनगर जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी डॉ. भिसे यांना सेवेतुन कार्यमुक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post