फेसबुकवर लाईव्ह करत तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचला

 फेसबुकवर लाईव्ह करत तरुणाने आत्महत्या करण्याचा मानस पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचलानवी दिल्ली : फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जीव दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमुळे वाचला. फेसबुकवर पोस्ट लिहित तरुणाने आत्महत्या करण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर फेसबुकवर लाईव्ह करत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल टीमने तातडीची पावलं उचलत त्याला शोधून काढलं आणि त्याचे प्राण वाचवले.दिल्ली पोलिसांना फेसबुकच्या हेडक्वार्टरकडून संबंधित तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची सूचना मिळाली. या सूचनेच्या आधारे सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांना आपल्या टीमच्या अधिकाऱ्यांना संबंधित तरुणांना शोधण्याचे आदेश दिले.

डीसीपींचा आदेश मिळताच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या शोधासाठी पोलीस पथकाने प्रयत्न सुरु केले. फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण पश्चिम दिल्लीतील राजोरी गार्डन परिसरातील रहिवासी असल्याचं त्यांना समजलं. हे समजताच सायबर सेलच्या टीमने त्याचं घर शोधून काढलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post