नगर जिल्ह्यातील मोठ्या अधिकाऱ्याच्या गाडीला आग

नगर जिल्ह्यातील मोठ्या अधिकाऱ्याच्या गाडीला आग

नगर :  निवासी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बांगर मॅडम यांच्या  शासकीय वाहनाने आज सायंकाळी सव्वापाच-साडेपाचच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. प्रसंगावधान दाखवत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आग प्रतिरोधक किटचा वापर केल्यानेकारला लागलेली आग नियंत्रणात आली.

 शासकीय कार क्रमांक एमएच 16 एन 0477 असा या वाहनाचा क्रमांक आहे.  रुग्णालयाच्या दर्शनी भागात उभ्या केलेल्या शासकीय कारच्या बोनेट मधून धूर आणि आग दिसून आली. बघता-बघता कारच्या पुढील भागातुन आगीच्या ज्वाला भडकू लागल्या.अचानक कारला आग लागल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. या दरम्यान रुग्णालयात असलेल्या इमर्जन्सी फायर सेफ्टीने वायूचा मारा करत लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. तसेच अग्निशमन दलास कळवले असल्याने थोड्यावेळात अग्निशमन

दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर पुन्हा पाणी मारण्यात आले.

आग विझवण्याकामी रुग्णालयाचे डॉ.मनोज घुगे, कर्मचारी प्रकाश पवार, सागर गायकवाड, भरत काशीद, संजय हंकारे, राहुल माने, प्रदीप ससे, अरविंद सोनवणे आदींनी प्रयत्न केले. प्रसंगावधान दाखवत आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली असली तरी कारचे नुकसान झाले आहे. वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्या मुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post