रस्त्यावरील कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार....किळसवाणा प्रकार करणा-या युवकास अटक

रस्त्यावरील कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार....किळसवाणा प्रकार करणा-या युवकास अटक चंद्रपूर : चंद्रपूर येथे नुकतीच एक संतापजनक घटना घडली आहे. एका युवकाने रस्त्यावरील कुत्रीवर  अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती उघडकीस झाली आहे. प्राणी मित्र संघटनांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण समाेर आले असून. चंद्रपूर पोलिसांनी हा किळसवाणा प्रकार करणा-या युवकास अटक केली आहे. 

शहरातील नागपूर मार्गावर असणा-या एका गाडीच्या शोरूम लगत संबंधित युवकाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. काहींनी येथील प्राणिमित्र संघटना प्यार फाउंडेशनला या प्रकाराची माहिती दिली.

प्यार फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ही गाेष्ट गांभीर्याने घेत पोलिसांना बाेलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयित युवक प्रकाश डाफ यास ताब्यात घेतले. त्याच्यावर कलम ३७७ (समलैंगिका कायदा) नुसार शहरातील रामनगर पोलिस चाैकीत गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post