बापरे! एक-दोन नाही तर तब्बल 8 वेळा मुख्यमंत्र्यांना मारले चाबकाचे फटके; Video

 बापरे! एक-दोन नाही तर तब्बल 8 वेळा मुख्यमंत्र्यांना मारले चाबकाचे फटके; Video नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये गौरा-गौरी पूजा करण्याची एक अनोखी परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण याच वेळी मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फटके मारले जात असल्याची प्रथा देखील पाहायला मिळत आहे. गोवर्धन पुजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हातावर एक दोन नव्हे तर तब्बल 8 फटके मारण्यात आले आहेत. लोकांच्या समस्या यामुळे दूर होतात असा येथील लोकांचा समज असल्याने मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फटके हे खावे लागतात. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. गोवर्धन पुजेच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल दरवर्षी राज्याच्या भल्यासाठी, शुभकार्यासाठी आणि अडथळ्यांच्या नाशासाठी चाबकाचा वार सहन करतात. मुख्यमंत्र्यांसोबत असलेली ही परंपरा शुक्रवारी सकाळी जंजगिरी गावात पार पाडली. एका ग्रामस्थाने चाबकाने त्यांना फटके मारले. ही प्राचीन परंपरा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. अशा प्रकारे चाबकाचा प्रहार अडथळ्यांचा नाश करणारा आहे, तसेच आनंद आणि समृद्धी आणणारा आहे असं मानलं जातं. यावेळी लोकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावात गर्दी केली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post