पोलिसच बनला भक्षक...तरूणासोबत अनैसर्गिक संबंध...व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पोलिसच बनला भक्षक...तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य...व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी



 सांगली : महाविद्यालयीन युवकासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा हवालदार हणमंत कृष्णा देवकर याच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

27 ऑक्टोबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास हणमंत देवकर आणि एक कर्मचारी इस्लामपूर येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रिणीला भेटून पुन्हा वसतिगृहात जात होता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले.

संबंधित युवकाने मी मैत्रिणीला भेटून येत आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या युवकाकडून त्याचा फोन नंबर घेतला. 29 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ येत हणमंत देवकर याने त्या युवकाला फोन करुन भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास प्रेम प्रकरण त्याच्या आणि मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्या कडून चार हजार रुपये उसने घेऊन हणमंत देवकर याला दिले.

वढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाला तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग, असे सांगितले. संबंधित तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे. असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकरने तू तसं न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन, अशी धमकी दिली.

पोलिसाच्या पवित्र्याने संबंधित तरुण घाबरला. देवकरने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तिथे देवकरने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले आणि त्याची व्हिडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post