शिकवणीला येणार्‍या अल्पवयीन मुलीवर तीन महिने अत्याचार...नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या

शिकवणीला येणार्‍या अल्पवयीन मुलीवर तीन महिने अत्याचार...नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या

 


पुणे :    पुण्यातील  वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पीडितेच्या आई वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात जात 52 वर्षीय नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. वानवडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह  विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post