'आज पावसात माझाही नंबर लागला'....माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भर पावसात खा.विखेंचे भाषण, पवारांना कोपरखळी... व्हिडिओ

'आज पावसात माझाही नंबर लागला'....माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भर पावसात खा.विखेंचे भाषण, पवारांना कोपरखळी... व्हिडिओ
नगर : कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दीवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कर्जत येथे राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेवेळी  पावसाचे दमदार आगमन झाले. तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. पाऊस सुरू असूनही दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कमी झाली नाही. 

 खासदार सुजय विखे यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला.  विखे म्हणाले, यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा असे खासदार विखे यांनी सांगितले.कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.आज पावसामध्ये माझाही नंबर लागून गेला. या सभेच्या माध्यमांतून गोदड महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे. 

यावेळा राम शिंदे याच्या कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार राम शिंदे अशा जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात सचिन पोटरे यांनी नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, धांडेवाडीचे सरपंच काका धांडे, दादा सोनमाळी, पप्पू धोदाड आदींचीही भाषणे झाली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post