आता निवडणुका झाल्या तर भाजपच्या जागा १०५ वरून ४० वर....


निवडणुका झाल्या तर भाजपच्या जागा १०५ वरून ४० वर....  पुणे, : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या संपत्तीवर आयकर विभागाने कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'अजित पवारांच्या प्रापर्टी असल्याचं सांगितलं जातं आहे, पण त्या त्यांच्या आहेत की नाही हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. तसंच, आम्ही निवडणुकांना घाबरत नाही पुन्हा जर निवडणुका झाल्या तर त्यांचे 105 वरून 40 वर येतील, असा टोलाही पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

 चंद्रकांत पाटील यांचं जे स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आम्हाला लवकर सत्ता पाहिजे. कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी ही धडपड आहे. भाजपने समर्थ, स्वच्छ विरोध पक्षाचं काम करावं. अशा धाडी, असं अटक सत्र काही नवीन राहिलेलं नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post