गडकरी, फडणवीस नागपुरात असताना भाजपचा बडा नेता कॉंग्रेसमध्ये....विधानपरिषद लढवणार्‍या बावनकुळेंना देणार आव्हान

गडकरी, फडणवीस नागपुरात असताना भाजपचा बडा नेता कॉंग्रेसमध्ये....विधानपरिषद लढवणार्‍या बावनकुळेंना देणार आव्हान 



नागपुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असता दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपा नेते आणि आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार आहेत. छोटू भोयर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपच्या पराभवाचे संकेत असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post