मी सुद्धा राजकीय आखाड्यातील अस्सल पैलवान, धोबी पछाड देणारच....आ.ल़ंके यांचे खा.विखेंना थेट आव्हान


मी सुद्धा राजकीय आखाड्यातील अस्सल पैलवान, धोबी पछाड देणारच....आ.ल़ंके यांचे खा.विखेंना थेट आव्हान पाथर्डी :आमच्या जंगी स्वागताने काहींना इतकी अडचण येते त्यांना असे वाटतंय निलेश लंके याने पारनेर तालुका सोडून कुठेच जाऊ नये.जिल्ह्याच्या व्यासपीठावरून लंकेवर टीका करण्याचा धंदा झालाय.तुझं माझं कुठे जुळेल का ?तुझ्याकडे सगळं आहे.माझ्याकडे हि जनता आहे.मात्र मी सुद्धा राजकारणातील आखाड्याचा अस्सल पैलवान आहे.तुम्हाला धोबीपछाड  दिल्या शिवाय राहणार नाही. अशी टीका आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर नाव न घेता केली.


शहरातील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयात  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,अहमनगर जिल्हा तालीम संघ व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सह. साखर कारखाना आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील २०० मल्लानी सहभाग घेतला.यावेळी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरखनाथ बलकवडे,काकासाहेब पवार,अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे ,शांताराम बागुल, ज्ञानेश्वर खुरंगे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, नानासाहेब डोंगरे, शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडु पाटील बोरुडे,दिपाजी बागुल, गाहिनाथ शिरसाट, रफिक शेख, बंडू भांडकर,पै.विलास चव्हाण, डॉ दीपक देशमुख, किरण खेडकर, देवा पवार, योगेश रासने, बबलू शिरसाट,पांडुरंग शिरसाट,नासिर शेख, संग्राम शेळके, संजय चव्हाण, हिरामण वाघ,युवराज पटारे, दगंबर गाडे,वैभव दहिफळे, चंद्रकांत भापकर आदी उपस्थित होते. 

 

पुढे बोलतांना लंके म्हणाले की,या नेत्याने पाथर्डी च्या कार्यक्रमात माझ्या कपड्यांवर सुद्धा टीका करायची सोडली नाही. मागील विधानसभेला समोर पैलवान सुद्धा दिसत नाही असे म्हणणाऱ्यांना शरद पवार यांनी अस्मान दाखवले. राज्य कुस्ती संघटनेचे शरद पवार हे अध्यक्ष असून पवार इज पॉवर असल्याने ते मल्लांचे प्रश्न निश्चित मार्गी लावतील. बबनराव ढाकणे यांना राजकीय पार्शवभूमी नसताना त्यांनी आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवला असून त्यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचे मोठे काम प्रताप ढाकणे हे करत आहेत. आम्ही दोघेही पवार साहेबांचे चेले असून पुढच्या वेळी ढाकणे हे कुस्ती जिंकणारच आहे. राजकीय आखाड्यातील मी सुद्धा पैलवान असल्याने अनेक डाव मलाही येतात. हे डाव आले नसले तर मला सतरंज्या उचलाव्या लागल्या असत्या असे शेवटी लंके म्हणाले. 


या वेळी बोलताना प्रताप ढाकणे म्हणाले कि लंके व मी रस्त्यावरचे पैलवान आहोत,तुम्ही खुराक खाऊन मोठे झाले असाल मात्र आम्ही भाकरी खाऊन मोठे झालेलो पैलवान आहोत. आमचे नाव घेतल्याशिवाय तुमचे भागत नाही एव्हडे तुम्ही आम्हाला घाबरता असा टोला त्यांनी  विखे यांचे नाव न घेता लगावला. बाळासाहेब ढाकणे, शिवाजी बडे,एम पी आव्हाड आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रास्तविक राजेंद्र ऊर्फ पप्पू शिरसाट यांनी तर सूत्रसंचालन अशोक गाडे यांनी करुन आभार नंदकुमार दसपुते यांनी मानले.


.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post