माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन

माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं निधन जालना: माजी खासदार पुंडलिकराव दानवे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे, ते ९४ वर्षांचे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोकरदनचे विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे ते वडील होते. भोकरदन तालुक्यातील सुतार पिंपळगाव येथे  त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुंडलिकराव दानवे हे दोन वेळा जालना लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत. जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. १९७७ आणि १९८९ मध्ये दोन वेळा त्यांनी खासदार पद भूषवलं होतं. भाजपकडून ते चार वेळा लोकसभा लढले, मात्र त्यातील एकच निवडणूक ते जिंकले. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ते म्हणाले होते की, "माझं वय ९२ वर्ष असलं म्हणून काय झालं? शरद पवारांनी आदेश दिल्यास जालना लोकसभेतून रावसाहेब दानवेंविरोधात लढेन. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post