अशोक चव्हाण पुन्हा एकदा मुख्यमंत्री.... कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य....

 अशोक चव्हाण पुन्हा एकदा मुख्यमंत्री.... कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं वक्तव्य....नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने काँग्रेसचं बळ वाढलं आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मेव्हणे आणि काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी मोठं विधान केलं आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असं भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयातून अशोक चव्हाण यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं. चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच हे यश मिळू शकलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना आम्हाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असं खतगावकर यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post